Mahakumbh Mela Stampede: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी; मृतांची धक्कादायक आकडेवारी आली समोर

WhatsApp Group

Mahakumbh Mela Stampede:मौनी अमावस्येला आज सकाळी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान आले आहे. पोलिस डीआयजी वैभव कृष्णा यांच्या मते, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, १९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, मृतांमध्ये २५ जणांची ओळख पटली आहे, मृतांमध्ये गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यातील लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर एकूण ९० जणांना रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी सध्या फक्त १९ गंभीर जखमींना दाखल करण्यात आले आहे, इतर सर्व जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

पोलिस डीआयजींच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री १.३० वाजता मोठी गर्दी होती. यावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले. तर गर्दीत ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याची स्पर्धा सुरू होती आणि लोक बॅरिकेड्स तोडून इकडे तिकडे धावू लागले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला, लोक घाटाच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांना चिरडत पुढे जाऊ लागले.

सध्या परिस्थिती नियंत्रणात : सध्या मेळ्याच्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. आज संध्याकाळपर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी अमृत स्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, १३ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे २५ कोटी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे.