छत्तीसगडमधील सुरगुजा येथे 5 वर्षांच्या मुलाला चाइल्ड कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पोलिस हवालदार असलेल्या मुलाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना हवालदार म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एसपी भावना गुप्ता यांनी सांगितले की, राज कुमार राजवाडे हे पोलिस कर्मचारी होते ज्यांचा अपघाती मृत्यू झाला. आता त्यांचा मुलगा नमन राजवाडे याची चाइल्ड कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर झारखंड पोलिसांनी 5 वर्षीय नमनला कॉन्स्टेबल बनवले आहे.
नमनचे वय फक्त 5 वर्षे आहे. सुरगुजाच्या पोलीस अधीक्षक भावना गुप्ता यांनी नमन यांना बाल हवालदाराचे नियुक्तीपत्र दिले. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल राजकुमार राजवाडे यांचा 3 सप्टेंबर 2021 रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला. हवालदाराची पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा नमन राजकुमार हे राजकुमार राजवाडे यांच्यावर अवलंबून होते. राजकुमार यांच्या मृत्यूनंतर छत्तीसगड पोलीस विभागाने कुटुंबाला सहकार्याचे आश्वासन दिले. वेतन व सुविधांचे लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर पोलीस मुख्यालयाच्या सूचनेवरून राजकुमार यांचा मुलगा नमन याची अनुकंपा नियुक्ती अंतर्गत बाल हवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Surguja, Chhattisgarh | 5-year-old boy posted as child constable after death of his father who was a Police constable
Raj Kumar Rajwade was a Police officer who passed away in an accident. Today, his son Naman Rajwade was appointed as child constable: Bhavna Gupta, SP (23/03) pic.twitter.com/yJ6QopG9Eq
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 23, 2023
मात्र, 5 वर्षाच्या मुलाला हवालदार पदावर नेमण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. सध्या, 5 वर्षीय नमन, जो बाल हवालदार म्हणून तैनात आहे, त्याला नियमानुसार 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर पूर्ण हवालदाराचा दर्जा मिळेल. त्याचवेळी, एसपी भावना गुप्ता यांनी पाच वर्षांच्या मुलाला नियुक्तीपत्र दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नमन राजवाडा यांना नियुक्तीपत्र देताना भावना गुप्ता आता तूही पोलीस झाला आहेस असे सांगत आहे.