भंडारा – भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आली आहे. येथील एका हॉस्टेल संचालकाने दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य केले आहे. नराधम आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपीने रस्त्यावरच तिच्यासोबत लैंगिक चाळे केले आहेत. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
वडिलांच्या फिर्यादीवरून आंधळगाव पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सुमेध श्यामकुवर (Sumedh Shamkuwar) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो मुलींच्या हॉस्टेलचा संचालक आहे. तसेच तो राष्ट्रवादीचा नेता देखील आहे. विनयभंगाची ही घटना उघडकीस येताच आता शाळेतील परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.