सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाचं आणि ठाकरे गटाचं नावं ठरलं

WhatsApp Group

राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अनेक दिवसांचा शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे  यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. मात्र, पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे असेल. पक्षाच्या नावाबाबत प्रथम प्राधान्य असलेल्या शिंदे गटाला विरोधी गटानेही प्रथम प्राधान्य दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अशा स्थितीत दोन्ही गटांना ते नाव दिले जात नाही.

आमचा मोठा विजय झाल्याचे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे ठेवले आहे, हा आमचा विजय आहे. असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.