हे जगातील एक असे रहस्यमय गाव आहे, जिथे प्रत्येक जीव आंधळा आहे. याला आंधळ्यांचे गाव असेही म्हणतात. या विचित्र गोष्टीमुळे हे गाव प्रसिद्ध झाले आहे. ऐकायला खूप विचित्र वाटतं पण त्यामागची कथा धक्कादायक आहे.
तिलटेपाक असे या गावाचे नाव आहे. हे मेक्सिको मध्ये Tiltepec Village In Mexico स्थित आहे. येथे राहणारे सर्व मानव आणि प्राणी आंधळे आहेत. त्यांना काहीच दिसत नाही. येथे मूल जन्माला आले की त्याचे डोळे चांगले राहतात, पण हळूहळू तो आंधळा होत जातो. हे केवळ माणसांसोबतच नाही तर प्राण्यांमध्येही घडते.
या गावात राहणार्या जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की शापित झाड हे त्यांच्या अंधत्वाचे कारण आहे. ते म्हणतात की लवाझुएला नावाचे एक झाड आहे, जे पाहिल्यानंतर माणसांपासून प्राणी-पक्ष्यांपर्यंत सगळेच आंधळे होतात. हे झाड वर्षानुवर्षे गावात आहे. हे झाड पाहून आंधळे झाल्याचे लोक सांगतात.
हे गाव जिथे आहे तिथे विषारी माश्या आढळून आल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. या माश्या चावल्याने माणूस आंधळा होतो. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मेक्सिकन सरकारने गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारलाही यश आले नाही.
सरकारने लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे शरीर इतर हवामानाशी जुळवून घेऊ शकले नाही. यामुळे लोकांना मजबुरीने स्वतःहून सोडावे लागले.