औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका आईनेचं आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. सादात नगर परिसरात काल दोन सख्ख्या बहिण भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंत पोलिसांकडून तपास करण्यात आला. तपासात पुढे या दोन्ही चिमुकल्यांचा जीव त्यांच्या आईनेच घेतल्याचं समोर आलं आहे.
औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरामध्ये दोन लहान सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते. मात्र सकाळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयामध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, आणि अली बिन फहाद बसरावी, असं या लहान मुलाचं नाव आहे.
