
‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असं नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
रानबाजार या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तेजस्विनी सिगरेट ओढताना दिसत आहे. त्यानंतर ती आपले कपडे काढताना दिसते. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याचं दिसते.
View this post on Instagram
हा टीझर शेअर करत “एकदा लोकांची सेवा करून पाहिली…, एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला…, एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…, सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय १८ मे ला!” असं कॅप्शन दिले आहे.