Anaya Soni: ‘मेरे साई’ फेम अभिनेत्रीची किडनी फेल, प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी पैसेही नाहीत

WhatsApp Group

‘मेरे साई’ या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी अचानक आजारी पडली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शूटिंगदरम्यान अभिनेत्री बेशुद्ध पडली. अभिनेत्रीची प्रकृती अजूनही ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे. अनायाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या आरोग्याचे अपडेट्सही दिले आहेत. अभिनेत्रीची किडनी निकामी झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनया सोनीची एक किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. अनायाच्या वडिलांनी सांगितले की ती सध्या डायलिसिसवर आहे आणि तिची किडनी बदलावी लागेल. वडिलांनी सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. अनायाच्या डायलिसिसवर बराच खर्च होत आहे, जो तिच्या कुटुंबाला सांभाळणे सोपे नाही. अशा परिस्थितीत एवढा पैसा कुठून आणणार, अशी चिंता त्यांना सतावत आहे.

अनाया याआधीही आजारी होती. अनयाचे कुटुंबीय दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. 2015 मध्ये ती फक्त एका किडनीवर जगत आहे. अनाया ‘इश्क में मरजावां’मध्येही दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ANAYA T SONI (@theanayasoni)

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा