बाळासाहेबांचं आणि आनंद दिघेंचं नातं कसं होतं?, पाहा व्हिडीओ

WhatsApp Group

मुंबई – ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर मुक्काम पोस्ट ठाणे (Mukkam Post Thane) हा मराठी चित्रपट लवकरच (Upcoming Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातलं नवं गाणं गुरुपौर्णिमा (Gurupurnima | Dharmaveer) रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातून दिवंगत आनंद दिघे आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या गुरु-शिष्याच्या अनोख्या नात्याचे दर्शन घडवण्यात आळे आहे. येत्या १३ मे ला हा चित्रपट रिलीज होतोय.

या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची भूमिका दिग्गज अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली असून मकरंद पाध्ये (Makarand Padhye) यांनी बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) भूमिका साकारली आहे. तसेच क्षितीज देठे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. या गाण्यामध्ये आनंद दिघे हे बाळासाहेबांचे पाय धुताना दाखवण्यात आले आहे. शिवसैनिकांसाठी हा प्रसंग डोळे पाणावणारा आहे. यातून बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्यामधील गुरु शिष्याचं नातं खूपच प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.

कोण होते आनंद दिघे?

आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ साली झाला. ठाण्यातल्या टेंभी नाका (Tembhi Naka, Thane) परिसरामध्ये त्यांचं घर होतं. या परिसरात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सभा व्हायच्या. बाळासाहेबांच्या भाषणांनी आणि ठाकरी शैलीने ते बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते झाले होते त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी (Shivsena) काम करायचं ठरवलं आणि ७० च्या दशकामध्ये शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. आनंद दिघेंच्या कामाचा सपाटा पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती.

२४ ऑगस्ट २००१ रोजी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि २६ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यामध्ये झालेल्या (२००१) शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.”