जगात अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत ज्यांना पाहून लोक थक्क होतात. अशा गोष्टी लोकांचे लक्ष वेधून घेतात. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय विचित्र कारबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याच्या नावावर जगातील सर्वात लांब कार (World’s Longest Car) म्हणून नोंद झाली आहे. ही काही सामान्य कार नाही. कारचे चित्र पाहून लोकांना आश्चर्य वाटते. या कारची खासियत काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
‘द अमेरिकन ड्रीम’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लेमोजीन कारला जगातील सर्वात लांब कार होण्याचा मान मिळाला आहे. या कारने 1986 मध्ये एक खास गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या कारची लांबी 100 फूट आहे.
म्हणजेच ही कार जवळपास 10 मजली इमारतीएवढी आहे. ही कार कोणत्याही कंपनीने डिझाईन केलेली नसून, या चित्रपटासाठी वाहनांचे सुप्रसिद्ध डिझायनर जे ऑरबर्ग यांनी ही डिझाइन केले आहे. अमेरिकेतीमधील कॅलिफोर्निया येथे राहणार्या जयला कारची खूप आवड होती आणि त्याने अनेक गाड्यांचे उत्तम डिझाइन बनवले आहेत.
100 फूट लांब लेमोजीनमध्ये 26 टायर होते आणि ते दोन्ही बाजूंनी चालवता येते. हे 1976 च्या कॅडिलॅक एल्डोराडो लिमोझिनवर आधारित आहे. डिझायनरने ही कार 1980 च्या दशकात डिझाइन केली आहे आणि 1992 मध्ये त्याची रचना प्रत्यक्षात आली. कारच्या पुढील आणि मागील बाजूस V8 इंजिन बसविण्यात आलं आहे. एवढेच नाही तर गाडी मधूनच वळू शकते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या कारमध्ये एक स्विमिंग पूल, जकूझी, बाथटब, छोटा गोल्फ कोर्स, अनेक टीव्ही, फ्रिज आणि टेलिफोन आहे, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे यात हेलिपॅड देखील होते ज्यावर हेलिकॉप्टर उतरू शकते. गाडीत 70 जण बसू शकत होते.