मुंबई – बॉलिवडूचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी Bappi Lahiri यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच गानकोकीळा लता दीदींच्या जाण्याच्या अवघ्या दहा दिवसांनंतर ‘बप्पी दा’ यांचे जाणे कोणालाही न पटणारे आहे.
काल बप्पी लाहिरी यांचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा बप्पा लाहिरी हा सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. त्यांची प्रतीक्षा केली जात होती. मुलगा आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यानुसार आज बप्पी दा यांचा अंत्यविधी केला जात आहे. नुकतेच ‘बप्पी दा’ यांचे पार्थिव शरीर त्यांच्या घरातून निघाले आहे. या महान व्यक्तिमत्वाचा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. इन्स्टंट बॉलिवूडने नुकतेच आपल्या इन्स्टा पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘बप्पी दा’ यांनी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारामुळे त्रस्त होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या एक वर्षांपासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया आणि छातीत संसर्गाची समस्या होती. हा आजार त्यांच्या मृत्यूचे कारण बनलं, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.