Kokan Refinery; कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापणार; समर्थक आणि विरोधकांकडून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी

WhatsApp Group

कोकणातील रिफायनरीचा मुद्या आता आणखीचं तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यामधील बारसू येथील रिफायनरीच्या मुद्यावर आता दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र लिहिल्याचं समोर आल्यानंतर समर्थक आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.

रिफायनरीविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. तर, रिफायनरी समर्थकांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. आपल्या दिल्ली भेटीत रिफायनरी समर्थक थेट केंद्रामधील मंत्र्यांची भेट घेत रिफायनरीच्या सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार आहेत.

कोकणात रिफायनरी हवी का नको? कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कि समर्थन? शिवसेनेची भूमिका काय असेल? या साऱ्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र समोर आले. विरोधातील शिवसेना रिफानरीबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले.

पण, असं असलं तरी शिवसेनेने मात्र स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका म्हणत पुन्हा एकदा सोयीस्कर भूमिका घेतल्याचे दिसून येतं आहे.