New ICC Cricket Rules: क्रिकेटच्या नियमांत मोठा बदल, होणार मोठं परिवर्तन, आयसीसीने घेतला निर्णय

WhatsApp Group

New ICC Cricket Rules: आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) क्रिकेटच्या काही नियमांत बदल करण्याची घोषणा केलीय. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात चेंडूवर थुंकी लावण्यास तात्पपुरती बंदी घातली होती. नव्या नियमानुसार चेंडूवर थुंकी लावण्यास कायस्वरूपी बंदी घालण्यात आलीय. यासह अनेक नियमांत बदल करण्यात आलाय.

जाणून घेऊया काय आहेत नवीन नियम

1)जेव्हा कुठलाही फलंदाज झेलबाद झाल्यानंतर आता नवा फलंदाज हा स्ट्राइकवरच खेळण्यासाठी येणार आहे. बाद झालेल्या फलंदाजाने क्रीज बदललं तरी त्याचा त्यावर काहीही परिणाम होणार नाही. जुन्या नियमानुसार एखादा फलंदाज बाद झाल्यास आधी स्ट्राइक बदलायचा, तेव्हा नवा फलंदाज नॉन स्ट्राईकवर खेळण्यासाठी येत असे.
2) कोरोनाच्या महामारीमुळे सुरुवातीपासून क्रिकेटवर परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे जगभरातील क्रिकेट बंद करण्यात आले होते. जेव्हा क्रिकेट पुन्हा सुरू झाले तेव्हा काही नवीन नियम बनवण्यात आले. त्यामध्ये चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. आता हा नियम कायमस्वरूपी करण्यात आला आहे.
3) टी-20 प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डच्या आत अतिरिक्त एक फिल्डर ठेवावा लागेल.

4) एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर जेव्हा नवीन फलंदाज स्ट्राइकवर येतो, तेव्हा त्याला पॅव्हेलियनमधून स्ट्राइकवर येण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 मिनिटांच्या आता आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये ही वेळ 90 सेकंद एवढी निर्धारित करण्यात आली आहे.
5) खेळताना फलंदाज आणि बॅट ही पिचच्या आतमध्येच असली पाहिजे. जर फलंदाजाने पिचच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करू शकतात. जर कुठल्याही चेंडूने फलंदाजाला पिचच्या बाहेर येण्यास भाग पाडले तर पंच हा चेंडू नोबॉल ठरवण्यात येऊ शकतो.
6) जर एखाद्या गोलंदाजाने गोलंदाजीदरम्यान, काही गैरवर्तन किंवा जाणूनबुजून काही चुकीची हावभाव केले, तर पंच त्याच्यावर कारवाई करू शकतात. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दंडात्मक कारवाई करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच धावा जमा करू शकतात. तसेच या चेंडूला डेड बॉल घोषित करू शकतात.