क्रिकेट विश्वात खळबळ; स्टार क्रिकेटरची तब्बेत अचानक बिघडली; ICU मध्ये दाखल

WhatsApp Group

Mayank Agarwal Admitted ICU Agartala Hospital: भारतीय क्रिकेट संघाच्या एका क्रिकेटरविषयी मोठी माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा फलंदाज आणि कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार मयंक अग्रवालबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर मयंक अग्रवालची तब्येत अचानक बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. मयंकचे चाहते या बातमीमुळं चिंतेत पडले आहेत. सध्या हा खेळाडू टीम इंडियातून बाहेर आहे. मयंक अग्रवालला एका रणजी ट्रॉफी सामन्यानंतर फ्लाइटमध्ये चढताना अचानक अस्वस्थ वाटत होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला तोंड आणि घशाचा त्रास होत असून त्यामुळेच आयसीयूमध्ये दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे.

टीम इंडियाचा फलंदाज आणि कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल रणजी ट्रॉफी सामन्यासाठी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे होता. सामन्यानंतर आगरतळा येथून परतण्यासाठी विमानात चढत असताना त्याची प्रकृती अचानक बिघडली. प्रवासादरम्यान त्याच्या तोंडात आणि घशात त्रास जाणवत होता. याच तक्रारीनंतर विमान टेक ऑफ करण्याआधीच त्याला लगेच विमानातून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर मयंकला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘मयंकची तब्येत सध्या स्थिर असून काही काळजी करण्याचं कारण नसल्याची महिती समोर अली आहे.

कर्नाटक संघाचा कर्णधार असलेला मयांक अग्रवालने 26 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आगरतळा येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात सहभाग नोंदवला होता. त्रिपुरा आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्यात तो खेळला होता. मात्र मंगळवारी म्हणजेच 30 जानेवारी रोजी सामना आटोपल्यानंतर कर्नाटक संघ सुरतला जाण्यासाठी विमानात बसला. इथेच मयांक आजारी पडला आणि त्याला विमानातून उतरवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, मयंक अग्रवालला सध्या आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयंक अग्रवाल सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने चार सामन्यांत दोन शतके झळकावली आहेत. आतापर्यंत त्याने 44.6 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत. मयंकने 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्याच्या नावावर 21 कसोटी सामन्यांमध्ये 41.3 च्या सरासरीने 1488 धावा आहेत. मार्च 2022 मध्ये तो श्रीलंकेविरुद्ध शेवटचा खेळला होता, तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.