हरमनप्रीत कौरने जिंकला आयसीसी ‘Player of the Month’चा पुरस्कार

WhatsApp Group

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सप्टेंबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी ICC पुरुष आणि महिला पुरस्कार जिंकले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर महिला गटात हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरली आहे तर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान पुरुष गटात हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

महिला क्रिकेट पुरस्कारासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये बांगलादेशचची निगार सुलताना जीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयसीसी महिला T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांचा समावेश होता. पण हरमनप्रीतने सुलतान आणि मंधानाला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.

हरमनप्रीतसाठी सप्टेंबर महिना खूप चांगला ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. अशा प्रकारे भारताने 1999 नंतर इंग्लंडमध्ये वनडेमधली पहिली मालिका जिंकली. तिने तीन सामन्यांत 221 धावा केल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 74 धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 111 चेंडूत 143 धावा केल्या होत्या.

ICC पुरूष प्लेयर ऑफ द मंथ नामांकितांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन आणि भारताचा अक्षर पटेल यांचा समावेश होता. मात्र बॅटने चमकदार कामगिरी केल्यानंतर रिझवानला पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकण्यात यश आले. रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या 7 सामन्यांच्या T20 मालिकेत 300 हून अधिक धावा केल्या. गेल्या महिन्यात त्याने आशिया कपमध्येही 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या.