IND vs ENG: 26 धावांत 5 विकेट घेऊन भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, पाकिस्तानच्या नावावर होता हा लज्जास्पद विक्रम

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी यजमानांच्या फलंदाजांचा कहर केला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. इंग्लंडच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने तीन षटकांतच आपल्या आघाडीच्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. हे तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.
भारतीय गोलंदाज इथेच थांबले नाहीत आणि पुढच्या काही षटकांत इंग्लंडचे 26 धावांत पाच गडी बाद केले. यासह इंग्लंड संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. सुरुवातीच्या पाच विकेट्स गमावल्यानंतर भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, पाकिस्तानने 1997 मध्ये कोलंबोमध्ये 5 विकेट गमावून 29 धावा केल्या होत्या.
What a start this has been for #TeamIndia.
Four wickets for @Jaspritbumrah93 and a wicket for @MdShami11. Four of the five batters depart for a 🦆#TeamIndia bowlers are on 🔥🔥🔥
Live – https://t.co/rjByVBo0gW #ENGvIND pic.twitter.com/z23ThkjOdL
— BCCI (@BCCI) July 12, 2022
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच विकेट्स गमावल्यानंतर सर्वात कमी धावसंख्या करणारे संघ
26/5 इंग्लंड ओव्हल – 2022
29/5 पाक कोलंबो एसएससी – 1997
30/5 झिम्बाब्वे हरारे – 2005