SRH Made Highest Score Of IPL History: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने इतिहास रचला आहे. हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादने याच मोसमात मुंबईविरुद्ध खेळताना 277 धावा केल्या होत्या. आता हैदराबादने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. हैदराबादने स्कोअर बोर्डवर 287 धावा करत स्वतःचा विक्रम मोडला आहे. ट्रॅव्हिस हेडने हैदराबादसाठी शानदार शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या 41 चेंडूत 102 धावांची खेळी केली आहे. याशिवाय हेनरिक क्लासेननेही 67 धावा केल्या आहेत.
🚨 𝗧𝗵𝗲 𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱 𝗶𝘀 𝗯𝗿𝗼𝗸𝗲𝗻 𝗮𝗴𝗮𝗶𝗻 🚨@SunRisers continue to hold the record for the highest total in IPL history 🧡🔥
2⃣8⃣7⃣/3⃣#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/5VOG8PGB6X
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
हैदराबादकडून फलंदाजांनी करताना अभिषेक शर्माने सुरुवातीला 22 चेंडूत 34 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने या मोसमातील चौथे शतक झळकावले आहे. हेड बाद झाल्यावर आता धावांवर नियंत्रण येईल असे वाटत होते, पण फलंदाजीला आलेल्या हेनरिक क्लासेननेही त्याच शैलीत खेळ सुरू ठेवला. त्याने 31 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 7 षटकार मारले गेले. याशिवाय एडन मार्करामनेही अप्रतिम फलंदाजी करत 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली.
The knock. The celebration. The man 🧡🔥#PlayWithFire #RCBvSRH pic.twitter.com/J0yDFJgHIJ
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 15, 2024
या सामन्यात बेंगळुरूचा गोलंदाज रीस टोपली 4 षटकांत 68 धावा दिल्या. याशिवाय आरसीबीकडून पदार्पण करणारा खेळाडू लॉकी फर्ग्युसनला 4 षटकात 52 धावा केल्या. यश दयालनेही 4 षटकात 51 धावा दिल्या. विजयकुमार वैश्यला या मोसमातील पहिला सामना खेळण्यात आला. हैदराबादने त्याचेही जंगी स्वागत केले आहे. विजयकुमार वैश्य 4 षटकात 64 धावा दिल्या.