Alcohol Dinker Cock : बेवडा कोंबडा मालकाला परवडेना

WhatsApp Group

Alcohol Dinker Cock : आजपर्यंत तुम्ही पुरुषाला अथवा महिलेला दारूचे व्यसन जडल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण चक्क कोंबड्याला कधी दारुचे व्यसन जडल्याचे कधी ऐकलेय का? होय… हे खरंय.. भंडाऱ्यातील कोंबड्याला चक्क दारुचं व्यसन जडलेय..

भंडाऱ्यातील या कोंबड्याला दररोज 45 मिली दारु लागते.. त्याशिवाय तो काही खातही नाही.. कोंबड्याच्या व्यसनामुळे मालकाला आर्थिक भूर्दंड तर लागतोय… त्याशिवाय सामाजिक प्रतिष्ठेमुळे मालकाला कोंबडयाचे हे व्यसन सोडवायाचे आहे. त्यामुळे आपल्या प्रिय कोंबडयाच्या व्यसनाधीनतेमुळे चिंतेत पडलेला मालक कोंबड्याची दारू सोडण्यासाठी विविध उपाय करू लागला आहे.

भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे यांच्या कोंबड्याला दारुचे व्यसन आहे.. पेशाने शेतकरी असलेल्या भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडला. त्यामुळे त्यांच्याकड़े विविध प्रजातिचे कोंबड़े पहायला मिळतात.

सध्या ते आपल्या कोंबडयाच्या दारु पिण्याच्या वाइट सवयीमुळे चिंतित आहेत. भाऊ कातोरे आपल्या कोबडयांला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करताय, मात्र कोंबडा पाणी पायलाही तयार नाही. आता तुम्ही म्हणाल त्याला तहान लागली नसेल. मालक दररोज देशी दारु पाण्यात मिसळून कोंबड्याला पाजतोय.. त्यानंतर कोंबडा अन्न खातोय.

गतवर्षी ” मरी ” रोग आला होता. कोबडयाला मरी रोग जडल्यामुळे खाणं आणि पिणेही सोडले होते.. कुणीतरी यावर मोहफूलाची देशी दारू पाजा असा सल्ला दिला होता.. मालकानेही त्याला दारु पाजली.. तेव्हापासून कोंबड्याला दारुचे व्यसन जडलेय. निर्व्यासनी मालकाला कोंबड्याला महिन्याला दोन हजारांची दारु पाजावी लागतेय.

कोंबड्याच्या या व्यसनाबाबत पशु वैद्यकीय अधिकारी निच्छिंत आहेत. याचे कोणतेही नुकसान नसल्याचे ते सांगत आहेत. उलट कोंबड़याच्या पोटातील जंतु मरणार असल्यामुळे फायदा होईल, असंच सांगत आहेत. मात्र मालकाला सोसावा लागत असलेला आर्थिक भूर्दंड लक्षात घेता, दारूच्या वासाची एकादी सिरप पाजण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच हळूहळू प्रमाण कमी केल्यास कोंबडयाची दारू सूटणार असा विश्वासही व्यक्त केला आहे.