लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी कोणाला आवडणार नाही. अशाच एका स्ट्रॉबेरीची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. या स्ट्रॉबेरीने वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. म्हणजे गिनीज बुकमध्ये या स्ट्रॉबेरीची नोंद करण्यात आली आहे Guinness World Record. ही स्ट्रॉबेरी जगातील सर्वात मोठी स्ट्रॉबेरी ठरली आहे World’s Biggest Strawberry. आता असे या स्ट्रॉबेरीत नेमके काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.
इज्राइलत्या कदिमा-जोरानमध्ये Kadima-Zoran, Israel राहणाऱ्या एका शेतकऱ्याने एरियल चाहीने Ariel Chahi अशा स्ट्रॉबेरीची लागवड केली, ज्या स्ट्रॉबेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. याचे कारण म्हणजे या स्ट्रॉबेरीचा आकार आणि त्याचे वजन.
View this post on Instagram
ही जगातील सर्वात मोठी आणि वजनदार स्ट्रॉबेरी आहे. तुम्ही आम्ही पाहतो ती स्ट्रॉबेरी कशी हलकीफुलकी, नाजूक, लहान असते. पण ही स्ट्रॉबेरी पूर्णतः वेगळी आहे. ही जगातील सर्वात मोठी स्ट्रॉबेरी Giant strawberry आहे. जिचे वजन तब्बल 289 ग्रॅम आहे.