
भारत स्वातंत्र्याची (Independance) 75 वर्षे साजरी करत आहे. आझादी का अमृत महोत्सवच्या (Azadi ka Amrit Mohotsav) निमित्ताने केंद्र सरकारकडून (Central Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना सरकार मोफत बूस्टर डोस (Booster Dose) देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली आहे.
भारत आजादी के 75 वर्ष मना रहा है। आजादी का अमृत काल के अवसर पर एक निर्णय ये भी लिया गया है कि 15 जुलाई 2022 से अगले 75 दिनों तक 18 वर्ष से अधिक आयु के नागरिकों को मुफ्त में बूस्टर डोज दी जाएगी: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, दिल्ली pic.twitter.com/fu5REvWr5h
— ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2022
सध्या भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. यांना सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस उपलब्ध आहेत. तर 18-59 वयोगटातील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. ज्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. पण आता या वयोगटातील नागरिकांनाही बुस्टर डोससाठी पैसे मोजण्याची गरज नाही. 15 जुलैपासून 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस मिळेल.