
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्प मुदतीच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाने व्याज सवलत योजना सुरू ठेवली आहे. तर अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजात 1.5 टक्के सूट मिळणार आहे.
यासाठी सरकारने अर्थसंकल्पात 34,846 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. व्याज सवलतीची भरपाई करण्यासाठी, म्हणजेच कर्जाच्या व्याजावर शेतकऱ्यांना दीड टक्के सूट, सरकार हे पैसे थेट कर्ज देणाऱ्या बँका आणि सहकारी संस्थांना देईल.
सहकारी संस्था आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात तर अनेक शेतकरी काही कारणास्तव कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांनाच व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल.
क्रेडिट कार्डसह स्वस्त कर्ज मिळवा
सध्या सरकार किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज देते. ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड नाही ते त्यांचे किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवू शकतात. जर एखाद्या शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतले तर त्याला 4% व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. एवढेच नाही तर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे.