क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

0
WhatsApp Group

आज 24 एप्रिलला क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस sachin tendulkar birthday. सचिन हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. पण या खेळाडूबाबत अशा काही गोष्टी आहेत, ज्या क्वचितच कुणाला माहीत असतील. जाणून घेऊयात सचिनला क्रिकेटचा देव का म्हणतात. आणि काही मनोरंजक गोष्टी.

क्रिकेटचा देव अशी ओळख निर्माण केलेल्या सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईतील वांद्रे येथे झाला. सचिनने 24 वर्षे मैदानावर चांगली कामगिरी केली. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. सचिनने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला ज्यात त्याने पहिल्या डावात केवळ 15 धावा केल्या. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी आलेल्या सचिनच्या नाकावर वकार युनूसचा बाउन्सर चेंडू लागून तो फ्रॅक्चर झाला. त्यावेळी त्याला दुखापत झाली मात्र त्याने मैदानाबाहेर जाण्यास नकार दिला, त्यानंतर सचिनने 57 धावांची खेळी केली.

सचिनच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर Ramesh Tendulkar असं आहे. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1930 रोजी अलिबाग, बॉम्बे प्रेसिडेन्सी, येथे झाला तर 19 मे 1999 रोजी त्यांचे निधन झाले. ते भारतीय मराठी कवी आणि कादंबरीकार होते. सचिन हा चार भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्यांच्या आईचे नाव रजनी तेंडुलकर Rajni Tendulkar असं आहे.

सचिन तेंडुलकरला मिळालेले पुरस्कार

1994 – क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार
1997-98 – राजीव गांधी खेलरत्न, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी भारताचा सर्वोच्च सन्मान
1999 – पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2001 – महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2008 – पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2014 – भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

सचिनने आपल्या कारकिर्दीत 463 हून अधिक एकदिवसीय सामने आणि सुमारे 200 कसोटी सामन्यांमध्ये 384 डाव खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने वनडेमध्ये 18426 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतके केली आहेत. त्याचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडला नाही. भविष्यात हा विक्रम कोण मोडतो ते पाहू. त्याने कसोटीत 51 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली असून त्यात त्याने 15921 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू होता. त्याने कामगिरी 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती.

भारतासाठी खेळण्यापूर्वी सचिन पाकिस्तानसाठी खेळलाय क्रिकेट

टीम इंडियाचा हा माजी खेळाडू पाकिस्तानकडून एका सामन्यात क्रिकेट खेळला आहे. सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. त्याआधी 1987 मध्ये तो पाकिस्तानी संघासाठी मैदानामध्ये उतरला होता. 1987 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यादरम्यान या दोन संघांमध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार होती. मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मैत्रीपूर्ण सराव सामना खेळला गेला आणि या सामन्यात सचिन पाकिस्तानकडून मैदानात उतरला होता.

हा एकदिवसीय सराव सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. भारताच्या फलंदाजीदरम्यान जावेद मियांदाद आणि अब्दुल कादिर यांनी लंचच्या वेळी मैदान सोडले आणि पाकिस्तानकडे पर्यायी खेळाडूचा पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत अवघ्या 14 वर्षांच्या सचिनला पाहुण्या संघाच्या वतीने मैदानात उतरण्याची संधी मिळाली होती.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव का म्हणतात?

1998 मध्ये भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या मालिकेदरम्यान सचिन तेंडुलकरने एका सामन्यात शानदार कामगिरी करताना द्विशतक झळकावले. या खेळीदरम्यान सचिनने डॅनियल मार्टिनसारख्या गोलंदाजांनाही सोडले नाही. या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू हेडन सचिन तेंडुलकरची फलंदाजी अगदी जवळून पाहत होता. सचिनची फलंदाजी पाहून हेडन इतका प्रभावित झाला की त्याने सचिनला देव म्हटले.

सचिन तेंडुलकरबद्दल हेडन म्हणाला होता की हो मी देव पाहिला आहे, तो भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. सचिन तेंडुलकरला आधी फक्त देव म्हटले जायचे आणि नंतर हळूहळू लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणू लागले. 23 डिसेंबर 2012 ला सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आणि 16 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईतील शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 74 धावा केल्या. सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागताच त्याने क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट पहिल्या द्विशतकाची नोंद सचिनच्याच नावावर

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज होता. 24 फेब्रुवारी 2010 ला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 147 चेंडूचा सामना करताना ग्वाल्हेरच्या मैदानावर त्याने हा कारनामा केला होता. त्याच्या या द्विशतकी खेळीत 25 चौकार आणि 3 षटकार खेचले होते.