Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला मिळाला ‘हा’ विशेष सन्मान, निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

0
WhatsApp Group

सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. आता सचिन आपल्या कर्तृत्वाच्या सिंहासनावर आणखी एक मोती जोडणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने त्याला ‘नॅशनल आयकॉन’ ही पदवी देण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी हे करण्यात आले आहे.

क्रिकेट दिग्गज आणि भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून एक नवीन इनिंग सुरू करेल, असे भारतीय निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे. सचिन दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओच्या रंग भवनात निवडणूक आयोगासोबत तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करणार आहे. तरुणांमध्ये सचिनची प्रचंड क्रेझ आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

सचिन तेंडुलकर करोडो युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे. त्याने कसोटी आणि वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट विश्वात नवे विक्रम केले आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे.

सचिन तेंडुलकरने 1992 ते 2011 पर्यंत भारतीय संघासाठी सलग 6 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. 2011 मध्ये त्याने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सचिनने भारतासाठी 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा आणि 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 100 हून अधिक शतके झळकावली आहेत.