Shocking Video: समुद्राच्या किना-यावर उंच लाटांमध्ये मुलगी रील्स बनवत होती, अचानक घडलं असं… पाहून थक्क व्हाल

Shocking Video: आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाइक्स मिळवण्यासाठी नवीन नवीन रील्स बनवत असतात. रील बनवून प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला आणि कोणताही धोका पत्करायला तयार असतात. व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेक वेळा लोक विनाकारण अडचणीत अडकतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी समुद्राच्या किनाऱ्यावर उंच लाटांमध्ये रील बनवते, परंतु तेव्हाच एक जोरदार लाट येते आणि ती दगडांवर पडते. त्याचवेळी शेजारी उपस्थित असलेले दोन लोक पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत, व्हिडिओ मध्ये पाहू शकता लोकांमध्ये घबराट पसरली आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचेही होश उडू शकतात.
Your “Life” is more important than your “Likes”. pic.twitter.com/3XNjyirbwJ
— Dipanshu Kabra (@ipskabra) July 13, 2022
हा धक्कादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे- तुमच्या आवडीपेक्षा तुमचे आयुष्य महत्त्वाचे आहे. शेअर केल्यापासून, या व्हिडिओला आतापर्यंत 1.9M व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.