नवी दिल्ली – एका मूकबधिर मुलीने गुरुवारी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस, सीआयएसएफ (CISF) यांच्या समजुतीमुळे मुलीचा जीव वाचवण्यास यश आलं. मात्र, या प्रयत्नात मुलगी जखमी झाली आहे. तिच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. मुलीने उडी मारण्यापूर्वीच तिच्या बचावाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमधील गुरुवारी मुलगी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या भिंतीच्या छतावर अचानक चढली. सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी त्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने कोणाचे ऐकले नाही आणि छतावरून खाली उडी मारली, त्यामुळे तिचे हात व पायांना दुखापत झाली आहे. तिची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
Saving Lives…
Prompt and prudent response by CISF personnel saved life of a girl who jumped from Akshardham Metro Station. #PROTECTIONandSECURITY #Humanity @PMOIndia@HMOIndia@MoHUA_India#15yearsofCISFinDMRC pic.twitter.com/7i9TeZ36Wk— CISF (@CISFHQrs) April 14, 2022
यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मुलीला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, ती कोणतीही माहिती देण्याच्या स्थितीत नाही आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे.असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.