धक्कादायक! सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाला घाबरून मुलीने केली आत्महत्या

WhatsApp Group

सातारा – पश्चिम महाराष्ट्रातून खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे. या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात सर्वांनाचं धक्का बसला आहे.

पहिली घटना ही साताऱ्यातील शाहूपुरी येथे घडली आहे. येथे अल्पवयीन मुलीने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सेमी इंग्लिश अभ्यासक्रम नको असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जवाबदार धरू नये असं त्या मुलीने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.

तर दुसरी घटना ही शहरातील मलकापुरमध्ये घडली आहे. ही मुलगी नववी मध्ये शिकत होती. या मुलीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. या मुलीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाहीय. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.