निवती; खडकांमधून निघणारा पाण्याचा प्रवाह लोकांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – गेल्या जवळपास दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि निर्बंध लागू झाल्यामुळे लोकांना घरातच राहावे लागले. या दरम्यान मोजक्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाता आले. पण आता जवळपास सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत जनजीवन पूर्वपदावर येत असून लोक घराबाहेर पडून फिरायला जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना एक अप्रतिम ठिकाण आणि दृश्य पाहायला मिळत आहे.

या ठिकाणाला ‘निवती खडक’ म्हणतात. बोटीवर बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ बनवला आहे, ज्यामध्ये या ठिकाणी मोठ्या खडकावरून लाटांच्या रूपात पाणी बाहेर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. RPG एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला, जो 16,800 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये हर्ष गोएंका यांना टॅग करत डॉ मधु टेकचंदणी नावाच्या महिला ट्विटर युजरने लिहिले की, “@hvgoenka महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या काठावर असलेल्या या जागेला ‘निवती रॉक्स’ म्हणतात.