
IND vs ENG T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन T20 मालिकेतील पहिला T20 सामना गुरुवारी, 7 जुलै रोजी साउथॅम्प्टन (Ind vs Eng Southampton T20) येथे खेळवला जाणार आहे. एजबॅस्टन येथील पाचव्या कसोटी सामन्यात कोरोनामुळे बाहेर पडलेला रोहित शर्मा या सामन्यातून परतत असून संघाचे नेतृत्व करत आहे.मात्र या मैदानावर भारतीय संघाचा यजमान संघाविरुद्ध रेकॉर्ड खूप खराब आहे आणि आजपर्यंत टीम इंडियाने या मैदानात त्यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.
इंग्लंडचा संघ सध्या नवे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत, ते प्रथमच T20 मालिकेत मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. जॉनी बेअरस्टोपासून जोस बटलरपर्यंत अनेक खेळाडू संघात आहेत जे टीम इंडियाला खडतर स्पर्धा देतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना उद्या (गुरुवारी) खेळवला जाईल, दुसरा T20 सामना शनिवार बर्मिंगहॅममध्ये आणि तिसरा T20 सामना रविवारी नॉटिंगहॅममध्ये होणार आहे. या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्या विजेतेपदासाठी इंग्लंडही प्रबळ दावेदार असेल, त्यामुळे या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी असेल.
भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान.
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, रीस टोपले, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन.