‘या’ दोन संघांत होणार आयपीएल २०२२ची पहिली मॅच, वानखेडेवर रंगणार झुंज!

WhatsApp Group

आयपीएल २०२२ (IPL २०२२) २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. १० संघांच्या या स्पर्धेचा सलामीचा सामना मागील हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळवला जाणार आहे. म्हणजेच गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या मोसमातील उपविजेता संघ कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) हे पहिल्या सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२१च्या विजेतेपदाच्या सामन्यामध्ये, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला होता.

या मोसमात एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील स्टेडियमवर ५५ सामने, तर पुण्यात १५ सामने खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यामधील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

सामन्याचे ठिकाण, प्रशिक्षण स्थळ आणि सांघिक हॉटेलमधील अंतर लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी बीसीसीआयसोबत बैठक झाल्याचे सांगितले आहे.