तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

0
WhatsApp Group

तारा सुतारियाने कार्तिक आर्यनसोबत डेटिंगच्या अफवांवर आपले मौन तोडले आहे. दरम्यान, तारा सुतारियाच्या आगामी ‘अपूर्वा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री दमदार आणि इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. तारा सुतारिया ही एक अशी अभिनेत्री आहे जिने फार कमी वेळात स्वत:च्या बळावर चित्रपटसृष्टीत इतकी लोकप्रियता मिळवली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून डेब्यू करणारी तारा लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘अपूर्वा’मध्ये धमाल करणार आहे.

तारा सुतारियाचा फर्स्ट लुक आला समोर 

तारा सुतारियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘अपूर्वा’चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये, अभिनेत्री तिच्या हातात रक्ताने माखलेले हत्यार घेऊन तिचा अर्धा चेहरा लपवताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये ‘अपूर्वा’ चित्रपटाच्या नावासोबतच रिलीज डेटही शेअर करण्यात आली आहे. मात्र, निर्मात्यांनी या फोटोतील तिच्या लूकबद्दल फारशी माहिती शेअर केलेली नाही. सोशल मीडियावर हा लूक शेअर करून अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘जेव्हा कोणताही मार्ग नसतो तेव्हा अपूर्वा स्वतःच मार्ग काढते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

तारा सुतारियाचा अॅक्शन-थ्रिलर आगामी चित्रपट ‘अपूर्व’ 15 नोव्हेंबर रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ‘अपूर्वा’ चित्रपटात तारा सुतारियाशिवाय राजपाल यादव आणि अभिषेक मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत.

तारा अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी यांच्यासोबत ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. ‘अपूर्व’ चित्रपटात अभिनेत्री तारा स्त्रीकेंद्रित चित्रपटात सशक्त आणि वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.