विराट कोहलीच्या मुलीची पहिली झलक, पाहा वामिकाचा व्हिडीओ

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करत आहे, दक्षिण आफ्रिकन संघाच्या इनिंग दरम्यान, टीव्ही स्क्रीनवर असे काही दिसले ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. या सामन्यादरम्यान विराट कोहलीची मुलगी वामिकाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली.


विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासह स्टँडवर उभी होती तेव्हा कॅमेरा तिच्याकडे वळला. गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून वामिका तिची आई अनुष्काच्या मांडीवर होती. विराट कोहलीची मुलगी वामिकाची झलक पहिल्यांदाच दिसली आहे.