Monkeypox Case : चिंता वाढली! देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

WhatsApp Group

Monkeypox Case : गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिलाच रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईमधून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

भारतात  केरळच्या कोल्लम येथे  मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम मेडिकल कॉलेजच्या एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले. देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार सध्या २७ देशात मंकीपॉक्सचे आतापर्यंत ८०० रुग्ण आढळले आहेत.