मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळवण्यात येणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर जाहीर केले आहे की आयपीएल २०२२मधील पहिला प्लेऑफ सामना २४ मे आणि एलिमिनेटर सामना २६ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवला जाईल.

आयपीएलचा दुसरा प्लेऑफ सामना २७ मे रोजी आणि अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची पूर्ण उपस्थिती असेल.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर्षी महिला टी२० चॅलेंजर्सच्या तारखांचीही घोषणा यावेळी केली आहे. महिला टी२० चॅलेंजर्सचे सामने २४ ते २८ मे दरम्यान ३ संघांमध्ये खेळवले जातील. हे सर्व सामने लखनऊच्या स्टेडिअममध्ये होणार आहेत.