
नवी मुंबई – राज्यातच नव्हे तर देशातही दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कारासारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईच्या नेरुळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक येथे घडला आहे.
याप्रकरणी मंगळवारी नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम हा एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करायचा. तेथेच त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
Raj Thackeray: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत दिली माहिती
42 वर्षीय नराधम स्वयंपाकी म्हणून एका व्यावसायिकाच्या घरी काम करायचा. तो झारखंड राज्यातील रहिवासी आहे. मात्र, ज्याठिकाणी तो काम करायचा तो तेथेच राहायचा. त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीला आपल्या सोबत नेरुळ येथे आणले होते. यानंतर नेरुळ येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातच त्याने आपल्या मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य केले. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या मालकिणीला सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला.