Video: Rohit Sharmaला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी केले ट्रॅफिक जाम, पाहा रेस्टॉरंटमध्ये कसा अडकला कॅप्टन

Rohit Sharma Video Team India Mumbai: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे देशभरात चाहते आहेत. त्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करूनही चाहते सामन्यापर्यंत पोहोचतात. नुकतीच अशी घटना घडली की, लोकांना रोहित किती आवडतो याचा अंदाज तुम्हालाही येईल. मात्र रोहितला त्याच्या चाहत्यांनी काही काळ अडचणीत टाकले. रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनी रस्त्यावर जोरदार जाम टाकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरंतर रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता. याची खबर त्याच्या चाहत्यांना मिळाली. हे पाहताच रेस्टॉरंटच्या बाहेर हजारो चाहते जमा झाले. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक गाड्या आणि बस वाहतूक कोंडीत अडकल्या. रोहित रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यावर हे दृश्य पाहून परत आत गेला. त्याच्यासोबत उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आत जाण्याचा सल्ला दिला.
Rohit’s kgf🥵@ImRo45 #RohitSharma𓃵pic.twitter.com/AqGnqp4X05
— YAHYA V45 (@V45Yahya) August 16, 2022
प्रचंड गर्दी पाहून रोहित अस्वस्थ दिसत होता. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधीही अनेक भारतीय खेळाडूंना त्यांच्या वेड्या चाहत्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.