प्रसिद्ध अभिनेत्रीने केली चोरी, मित्राच्या घरातून गायब केले एक किलो सोने

साऊथ अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. या अभिनेत्रीवर चोरीचा आरोप असून त्यामुळे तिला अटकही करण्यात आली आहे. अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्राच्या घरी ही चोरी केली होती.

WhatsApp Group

Actress-Influencer Soumya Shetty Arrested: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीवर सोन्याच्या चोरीचा आरोप आहे. अभिनेत्री सौम्या शेट्टीने ही चोरी भारतीय टपाल विभागाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी केल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्रीने तिच्याच मित्राच्या घरी ही घटना घडवली. पोलिसांनी वेळीच कारवाई करत एफआयआर नोंदवून सौम्याला अटक केल्याचे बोलले जात आहे.

भारतीय टपाल विभागाचे निवृत्त कर्मचारी प्रसाद बाबू यांनी त्यांच्या घरातून 150 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की सौम्या प्रसादच्या घरी वारंवार येत असे. प्रसादची मुलगी मोनिकाशी तिची घट्ट मैत्री होती आणि त्यामुळेच प्रसादची जीवनशैली आणि महागड्या गोष्टींबद्दल तिला माहिती होती. अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला आहे. पोलिसांनी सांगितले की, सौम्या अनेक वेळा सोने चोरण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेली होती. बाथरूमला जाण्याचे निमित्त करून ती पुन्हा पुन्हा खोलीत जात असे.

पोलिसांनी कारवाई केली
मोनिकाचे कुटुंबीय लग्न आटोपून परत आले असता घरात ठेवलेले सोन्याचे साहित्य गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. फॉरेन्सिक तपासात बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात आले. 11 जण संशयाच्या भोवऱ्यात आले. यानंतर चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये तिघांना अटक करून प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सौम्याचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सौम्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही चोरी केल्यानंतर सौम्या शेट्टी चतुराईने गोव्याला निघून गेली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची महिला दिनानिमित्त विशेष भेट! गॅस सिलेंडर केले स्वस्त

74 ग्रॅम सोने जप्त
अटकेनंतर सौम्या शेट्टीने चोरीची कबुली दिली. आतापर्यंत पोलिसांना 74ग्रॅम सोने सापडले आहे. अभिनेत्री म्हणते की तिच्याकडे उर्वरित सोने नाही, म्हणून ती ते परत करू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणावर पुढील कारवाई सुरू आहे.