Amala Paul Pregnancy: लग्नाच्या दोन महिन्यातच प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; बेबीबंपचा फोटो केला शेअर

0
WhatsApp Group

साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमला पॉल हिने बॉयफ्रेंड जगत जोशीसोबत गुपचूप लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आमलाने प्रेग्नन्सी झाल्याची घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खूप उत्सुक आहे.

गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला अमला पॉलने जगत देसाईसोबत लग्नगाठ बांधली. अमलाचे जगतसोबतचे हे दुसरे लग्न आहे, याआधी ती एएल विजयसोबत होती. विजयसोबतचे तिचे लग्न तीन वर्षे टिकले आणि त्यानंतर दोघेही वेगळे झाले. अमला पॉलचे नाव तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत होते. आता तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून अभिनेत्री पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amala Paul (@amalapaul)

बुधवारी अमलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत पती जगत देसाईही दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amala Paul (@amalapaul)

साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव अमला पॉल हिने हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगणसोबतही चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमला गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या ‘भोला’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. एवढेच नाही तर साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे.