या प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर प्रेग्नेंसी फोटोशूट, VIDEO आणि फोटो होतोय व्हायरल

WhatsApp Group

बॉलिवूडमध्ये सध्या प्रेग्नेंन्सीच्याच चर्चा सुरू आहेत. नुकतंच सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिलाय, तर आलिया भट्टच्या बेबी बंपचे फोटो समोर येत आहेत. या सर्व प्रेग्नेन्सी आणि बेबी बंपच्या चर्चा सुरु असताना, आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अंडरवॉटर प्रेग्नेंसी फोटोशूट केल्याची चर्चा आता सुरु झालीय. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.त्यामुळे ही अभिनेत्री कोण आहे? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या सोनम कपूर (Sonam Kapoor) , आलिया भट्ट (Alia bhatt) आणि बिपाशा बसू (Bipasha basu) यांच्या बेबी बंपच्या स्टाईलची चर्चा सुरु आहे. यातील सोनम कपूरने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तर अद्याप आलिया भट्ट आणि बिपाशा बसू यांची प्रेग्नेंन्सीचे महिने पुर्ण झाले नाहीयेत.

या सर्व प्रेग्नेंन्सीच्या चर्चेत आता एका अभिनेत्रीने धाडसी प्रेग्नेंसी फोटोशुट केले आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. असे धाडसी बेबी बंप फोटोशुट करणारी ही अभिनेत्री समीरा रेड्डी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

समीरा रेड्डीने अंडरवॉटर प्रेग्नेंसी शूट केले होते. या फोटोशूटमध्ये तिने बिकनी परिधान केली होती. आणि ती पाण्याची मध्यभागी जाऊन तीने अंडरवॉटर प्रेग्नेंसी शूट केले आहे. यासोबत तिने अनेक फोटोंचे मिश्रण करून व्हिडिओ देखील बनवला होता. हा व्हिडिओ आणि फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. सध्या तिचे फोटो आणि व्हिडीओ वायरल होतं आहेत.