धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचं 27 व्या वर्षी निधन, जंगलात मृतदेह सापडला

WhatsApp Group

Cole Brings Plenty Passes Away: 1993 फेम अभिनेता कोल ब्रिंग्ज प्लेंटी बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अभिनेत्याचे वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. ही बातमी येताच खळबळ उडाली आहे. असे म्हटले जाते की, प्लेंटी बराच काळ बेपत्ता होता. अभिनेता ब्रिंग्सचे काका आणि अभिनेता मो ब्रिंग्स प्लेंटी यांनी ही माहिती दिली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना शोधण्याचे आवाहनी त्यांनी केले होते. ताज्या अहवालानुसार कोल ब्रिंग्स प्लेन्टीचा मृतदेह जंगलात सापडला आहे. या अभिनेत्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही करण्यात आला होता.

अटक वॉरंट जारी करण्यात आले होते 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स पोलिसांनी कोल ब्रिंग्स प्लेंटीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अभिनेत्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by IndigenousTV 🦅 (@indigenous.tv)

अभिनेत्याच्या काकांनी मृत्यूला दुजोरा दिला
या घटनेनंतर लॉरेन्स पोलिस कोल ब्रिंग्स प्लेन्टीचा शोध घेत होते. पोलिसांनी सर्व यंत्रणांना कळवले होते. अभिनेता कुठेही दिसला तर तत्काळ पोलिसांना कळवा, असेही सांगण्यात आले. आता अचानक प्लांटीचा मृतदेह जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. निधनाची माहिती अभिनेत्याचे काका मो ब्रिंग्स प्लेंटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट 
मो यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले की कोल ब्रिंग्स प्लेंटी आता त्याच्यासोबत नाही. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. यासोबतच या कठीण काळात ज्यांनी आपल्या कुटुंबाला साथ दिली त्यांचे मो यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोल ब्रिंग्ज प्लेन्टीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.