​जगातील सगळ्यात गोरे लोक ‘या’ देशात! भारताशी आहे हजारो वर्ष जुने नाते

0
WhatsApp Group

जगातील प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटते. साधारणपणे गोरा रंग हा सौंदर्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यामुळेच लोक गोरी होण्यासाठी किंवा गोरी त्वचा मिळविण्यासाठी अनेक उत्पादने वापरतात. काही लोक शस्त्रक्रियेचाही अवलंब करतात. बर्‍याच लोकांना गोरे दिसायचे असते, परंतु प्रत्येकजण असे नाही. जगात एक असाही देश आहे जिथे लोक गोरेपणाने त्रस्त आहेत. या देशातील जनता सर्वात गोरी समजली जाते.

आयरिश पोस्टच्या रिपोर्टनुसार, आयरिश लोकांची त्वचा जगातील सर्वात गोरी आहे. याचे मोठे कारण म्हणजे त्यांची जीन्स, जी त्यांना वारशाने मिळालेली आहे. तसेच येथील पर्यावरणाचाही यात महत्त्वाचा वाटा आहे.आयर्लंड एक अशी जागा आहे जिथे अतिनील विकिरण कमी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांच्या त्वचेवर हलके रंगद्रव्य निर्माण होते आणि त्यामुळे लोकांच्या त्वचेचा रंग तसा गोरा राहतो.

यूएस पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे म्हटले आहे की SLC24A5 नावाच्या जनुकामुळे त्वचेचे रंगद्रव्य निर्माण होते आणि त्यातील उत्परिवर्तन त्वचा किती गोरी असेल हे ठरवते. संबंधित उत्परिवर्तन A111T आयर्लंडमधील लोकांमध्ये आढळून आले. अहवालानुसार, ज्याला हे उत्परिवर्तन फिकट त्वचेसाठी जबाबदार असल्याचे आढळले, त्यांचा अनुवांशिक कोड एकाच व्यक्तीकडून आला आहे.

जरी बहुतेक लोकांना गोरा रंग हवा असतो, परंतु या देशात तसे नाही. सर्वेक्षणानुसार, अतिशय गोरी त्वचा असल्यामुळे 61% आयरिश लोक इतर देशांतील लोकांच्या तुलनेत स्वत:ला ‘अप्रकर्षक’ मानतात. संशोधकांच्या मते , या जनुकासाठी कोणती व्यक्ती कोण जबाबदार होती हे शोधणे कठीण आहे. अभ्यासानुसार, ही व्यक्ती 10,000 वर्षांपूर्वी भारत किंवा मध्य पूर्वेतील रहिवासी होती आणि त्याच्या वंशजांनी त्यांची जीन्स आयबेरियन द्वीपकल्पातून आयर्लंडमध्ये आणले आणि त्याची वाढ झाली