
मुंबई – आज एकनाथ शिंदे सरकारने राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने 164 मतं पडली. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin, 3 members abstained from voting. pic.twitter.com/ZbaM54n1fd
— ANI (@ANI) July 4, 2022
राज्याच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केले. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले.