चालू बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका नंतर…

WhatsApp Group

एसटी बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर बस स्थानकाबाहेर ही घटना घडली. अशोक भापकर असे या चालकाचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेअरिंगवर पडले आणि बसचे नियंत्रण सुटले. मात्र, प्रवासी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अशोक भापकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिक व प्रवाशांच्या मदतीने मोठी दुर्घटना टळली. ही संपूर्ण घटना एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बस पारनेर बसस्थानकातून निघताच भापकर यांना झटके आले आणि ते स्टेअरिंगवर पडले आणि बसवरील नियंत्रण सुटले. बाजूचे दुकानदार उदय औटी, राजू खोसे, राहुल काळे, अनिल ठोंबरे, विनायक कानडे, नितीन चेडे यांनी बसकडे धाव घेत केबिनमध्ये घुसून बसचे नियंत्रण केले, त्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, बस चालकाला पारनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल नेण्यात आले आहे.