बारावीचा निकाल लागताच आजपासून मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, या संकेतस्थळावर करा ऑनलाईन नावनोंदणी

WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 8 जूनला बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आज 9 जून पासून मुंबई विद्यापीठाने पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. काल रात्री यासाठीचे वेळापत्रक उशिरा जारी करण्यात आले आहे. गुरुवार, 9 जूनपासून, प्रवेश अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. ही प्रक्रिया 20 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.. त्याचप्रमाणे, विद्यापीठ 9 जूनपासून, 20 जूनपर्यंत प्रवेशपूर्व नोंदणीसाठी mum.digitaluniversity.ac हे ऑनलाइन पोर्टल देखील उपलब्ध करून देणार आहे.