
दीपा (Deepa aka Pauline Jessica) नावाने प्रसिद्ध असलेली 29 वर्षीय तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका (Tamil Actress Deepa aka Pauline Jessica) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दीपा हिने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चेन्नई (Chennai) येथील एका इमारतीमध्ये घराच्या छताला असलेल्या पंख्याला लटकलेला तिचा मृतदेह 18 सप्टेंबर रोजी आढळून आला.
पोलिसांना तिच्या खोलीतून एक संशयास्पद चिठ्ठी मिळाली असल्याची चर्चा आहे. या चिठ्ठीमुळे आत्महत्येच्या संशयासोबतच इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले जात असून, उलटसुलट चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Tamil actress Pauline Jessica found hanging in Chennai flat
Read @ANI Story | https://t.co/LzyMJqVxG4#PaulineJessica #Chennai #PaulineJessicasuicide pic.twitter.com/u51J4OdxYZ
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2022
दीपा नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने इतक्या कमी वयात आत्महत्या केल्यामुळे दाक्षिणात्या सिनेसृष्टीला जोरदार धक्का बसला आहे. दीपा हिचा मित्र प्रभाकरन सर्वात आधी घटनास्थळावर पोहोचला. तिचा मृतदेह पाहून प्रभाकरन याने आंध्र प्रदेश येथील चित्तूर येथे राहणाऱ्या दीपा हिच्या भावाला कल्पना दिली. त्यानंतर त्याने कोयम्बेडू पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.