Maharashtra Police Bharti 2022: पोलीस भरतीची तारीख ठरली; अर्ज करण्याची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता जाणून घ्या सर्व माहिती

WhatsApp Group

Police Bharati 2022 : पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. राज्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा  लक्षात घेता, पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पोलिस दलातील विविध जिल्ह्यातील तब्बल 14 हजार 956 जागांसाठी ही भरती असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यात या जागा भरल्या जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. राज्यात विविध जिल्ह्यातील तब्बल 14 हजार 956जागांसाठी ही भरती होणार आहे.

भरतीबद्दल तपशील

  • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (LMV Driving License).
  • वयोमर्यादा खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची अखेरची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
  • वेतन 5,200 ते 20,200 रुपये (ग्रेड पे– 2,000रुपये.) विशेष भत्त्यासह 500 रुपये

कुठल्या जिल्ह्यात किती जागा

मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154