सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. सावंतवाडी येथील उभाबाजार भागात निलिमा नारायण खानोलकर आणि श्यामली शांताराम सावंत अशा दोन वृद्ध महिलांचा निर्घुण खून करण्यात आला होता. हे २ खून करणारा आता पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याने पैशासाठीच हे खून केल्याची कबूली पोलिसांनी दिली आहे.
सिंधुदुर्गातील या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांवरही मोठा दबाव होता. मात्र स्थानीक पोलिसांनी अत्यंत हुशारीने या आरोपीला गजाआड केल. या आरोपीचे नाव कुशल उर्फ विनायक टंगसाळी असं असून त्याने पैशासाठी हे खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या घरात दोन्ही वृद्ध महिलांची हत्या झाली होती त्याच घरासमोर कुशल उर्फ विनायक टंगसाळीच घर आहे.