क्रिकेट जगतावर शोककळा, या प्रसिद्ध अंपायरचे झाले निधन

WhatsApp Group

पाकिस्तानचे माजी पंच असद रौफ यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधनं झालं आहे. लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा भाऊ ताहिर रौफने सांगितले की, असद दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. असद रौफ हे 66 वर्षांचे होते. एकेकाळी आयसीसीच्या एलिट पॅनलमध्येही त्यांचा समावेश होता.

असद रौफ यांचा 2006 मध्ये आयसीसी एलिट अंपायर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला होता. 2013 पर्यंत ते या पॅनलमध्ये राहिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामने खेळले आहे. 2013 साली आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचे नाव आल्यानंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली.

लाहोरमध्ये बूट-कपड्यांचे दुकान चालवायचे

2013 मध्ये रौफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनलमधूनही वगळले होते. यानंतर बीसीसीआयने तीन वर्षांनी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवले आणि 2016 मध्ये त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली. यानंतर रौफ यांनी लाहोरमध्ये बूट-कपड्यांचे दुकान उघडले. गेल्या अनेक वर्षांपासून ते या व्यवसायातून घरखर्च चालवत होते.