जोडप्यानं 80 वर्ष दिली एकमेकांची साथ अन् शेवटचा श्वासही सोबतच घेतला; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

WhatsApp Group

जन्म, मृत्यू या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात, असे म्हटले जाते. त्यापुढे कोणाचेही काहीही चालत नाही. मात्र कधी कधी अशा घटना घडतात ज्या पाहून सगळ्यांनाच धक्का देऊन जातात. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामधील श्रीनगर शहरातील कालेडी गावामध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे.

येथे 105 वर्षांचा नवरा आणि त्याची 101 वर्षांची पत्नी ही जोडी (Oldest couple) एक अनोखं उदाहरण ठरली आहे. लग्नानंतर हे जोडपं 80 ​​वर्षे एकत्र राहिलं. दोघांचा स्नेह एवढा जास्त होता की अवघ्या पाच तासांच्या अंतराने तीन दिवसांपूर्वी दोघांचाही मृत्यू झाला (Elderly Couple died on Same Day). आधी नवऱ्याने जगाचा निरोप घेतला त्यानंतर पत्नी शांत झाली आणि पतीच्या मृत्यूनंतर पाच तासांनी तिनेही आपला जीव सोडला. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर शहरातील कोल्डी गावामधील हे जोडपं पूर्वी चर्चेचा विषय होतं आणि मृत्यूनंतरही चर्चेत राहिलं. भैरुसिंग रावत आणि त्यांची पत्नी हिरादेवी असे या जोडप्याचे नाव होते. रावत यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं 80 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. हे दाम्पत्य त्यांचा ७० वर्षीय मुलगा शंकरसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी गुरुवारी दोघांनी मिळून जगाचा निरोप घेतला.