देशाला मिळालं पहिलं अ‍ॅपल स्टोअर, Appleचे CEO Tim Cook च्या हस्ते उद्घाटन

0
WhatsApp Group

मुंबई : भारतातील पहिले अॅपल स्टोअर आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. टिम कूक यांनी दुकानाचे दरवाजे उघडून औपचारिक उद्घाटन केले. बाहेर येताना, टिम कुक यांनी वाट पाहणाऱ्या लोकांना हस्तांदोलन करून आणि नंतर नमस्कार करून अभिवादन केले. आज अॅपल स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत स्वतः टीम कुक करत आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅपल स्टोअरमध्ये जल्लोष सुरू आहे. Apple मधील कर्मचारी उबदार आणि उत्साही आहेत. टीम कुकने स्वतः सर्व स्टाफमध्ये उत्साह संचारला आहे. सुरुवातीला टीम कुकसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा लोकांमध्ये होती.

टिम कुक यांनी ट्विट केले होते की ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन ऍपल स्टोअरमध्ये ग्राहकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.

टीम कुक बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर टीम कुक गुरुवारी दिल्लीत अॅपलच्या स्टोअरचे उद्घाटनही करणार आहेत.