‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ अभियानाचा समारोप राज्यपाल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न
![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ या 75 दिवसांच्या सागरी किनारा स्वच्छता अभियानाचा समारोप आज जुहू चौपाटी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डॉ. वी. एस. पठानिया, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सतिश मोढ व कोस्ट गार्ड, एन सी सी, मुंबई महानगरपालिका तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
पृथ्वीबद्दल भारतीयांच्या मनात प्राचीन काळापासून आदरभावना आहे. सकाळी उठताना पृथ्वीची माफी मागूनच लोक जमिनीवर पाय ठेवतात. आज मात्र पृथ्वी, समुद्र व निसर्गाबद्दल लोकांची आदराची भावना कमी होत असल्याचे दिसते. आज समुद्रात हजारो टन प्लास्टिक व इतर कचरा टाकला जात आहे ही खेदाची गोष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘स्वच्छ भारत’ निर्मितीचा संदेश दिला आहे. आपण स्वस्थ भारत निर्माण करण्यासाठी स्वच्छ भारत तसेच स्वच्छ सागरी किनारा ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानामध्ये लोकसहभाग अतिशय आवश्यक आहे समुद्रातून 15 हजार टन प्लास्टिक कचरा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.